हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. आपण 5 जूनला सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहोत अस राज ठाकरेंनी जाहीर केलं. गेल्या काही दिवसांपासून मशिदी वरील भोंग्या वरून राज ठाकरेनी आक्रमक पवित्रा घेत हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय.
मागील दोन-तीन वर्षांपासून राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची चर्चा होती. पण कोरोना व इतर कारणांमुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर पडला होता. अखेर त्यांचा मुहूर्त ठरला आहे. अयोध्येत भव राममंदिर उभारणीचे काम सुरू आहे. तिथे जाऊन हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आगामी निवडणुकांमध्ये उतरण्याचे राज ठाकरे यांनी ठरवल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी त्यांचा अयोध्या दौरा महत्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, मशिदी वरील भोंग्या वरून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. माझा प्रार्थनेला विरोध नाही. पण मुस्लिमांना लाऊड स्पीकर वरच ऐकायचे असेल तर आमच्या आरत्याही त्यांना लाऊड स्पीकरवरून ऐकाव्या लागतील अस म्हणत 3 तारखेपर्यंत वाट बघू अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा इशारा राज ठाकरेंनी दिला.