हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील नेत्यांवर एनसीबीच्यावतीने चौकशी करीत कारवाई केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी व भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच चित्रपट क्षेत्रातील अनेकांकडून एनसीबी खंडणी वसूल करीत असल्याचे त्यांनी म्हंटले. त्यांच्या या आरोपांना मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच एनसीबी व मनसेचा काही संबंध नाही. आता राष्ट्रवादीच्या खंडणीखोरांचीच यादी देतो. मग करा चौकशी आणि कारवाई, असा इशारा खोपकरणी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी, मनसेवर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांना मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिले असून धक्कादायक माहितीही दिली आहे. यावेळी खोपकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे व मनसेचा काहीही संबंध नाही तसेच यास्मिन वानखेडे यांचाही संबंध नसून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांना एवढं समजत नाही का? मलिक तुमच्याकडे पुरावे आहेत का? राजकारण नंतर खेळावे, अशी टीका खोपकर यांनी केली.
यावेळी खोपकर यांनी राष्ट्रवादीवरही टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने चित्रपटांच्या सेटवर कोण कोण खण्डणी मागायला येते. त्या सर्वांची आम्ही यादी काढतो. त्यांच्या सर्वांच्यावरही गुन्हा दाखल करावा. मलिक यांना एवढंही कळत नाही का कि एका महिलेवर कोणत्या पातळीपर्यंत जाऊन टीका करायची, असा टोलाही यावेळी खोपकर यांनी लगावला आहे.