ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटीला जाऊन…; मनसेचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून परत येण्याचे आवाहन केल्यानंतरही एकनाथ शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अशात आता शिंदे गट मुंबईत दाखल होत असल्याने मुंबईसह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून मनसेचे नेते गजानन काळे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. “भावनिक साद घालण्यापेक्षा ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेवून यावे, असा टोलाही काळे यांनी लगावला आहे.

गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमधून शिवसेना व उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, आता पिता पुत्रांनी भावनिक साद घालण्यापेक्षा थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेवून यावे.( विमानाचा खर्च परवडणार नाही) असे म्हंटले आहार. तसेच उध्या शिंदे व भाजपचे सरकार आल्यानंतर मंत्रिपदावरूनही ट्विटमधून काळे यांनी निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिपदाबाबतही काळे ट्विट केले असून त्यात त्यांनी म्हंटले आहे की, नाहीतर छोटे नवाब यांना पण शिंदे सेनेत सामील करून स्वतःचे मुख्यमंत्री पद नाही पण किमान छोटे नवाब यांचे मंत्रीपद तरी वाचवावे, असा टोला काळे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

Leave a Comment