हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील असणाऱ्या सुमारे 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील 40 हून अधिक समुद्र किनाऱ्यांच्याबाबत मनसेच्यावतीने विशेष मोहीम राबविली जाणार आहे. याबाबत खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी फेसबुक द्वारे महत्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवरील 40 हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. शनिवार, 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’ राबविण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले आहे.
मनसे नेते अमित ठाकरे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटद्वारे माहिती दिली असून त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, “महाराष्ट्रात 720 किलोमीटर लांबीचा समुद्र आहे. या समुद्राच्या असलेल्या किनारपट्टीवरील 40 हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. एक विषेश आणि वेगळ्या स्वरूपाची हि मोहीम मनसेने हाती घेतली आहे.
https://www.facebook.com/amitthackerayofficial/videos/455612365937458/
आम्ही सर्व मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रित येऊन शनिवार, 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’ राबविणार आहोत. या मोहिमेत सर्वानी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे नेते अमित ठाकरे यांनी केले आहे.