हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारच्यावतीने दहीहंडी सण सार्वजनिक स्वरूपात न साजरे करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत दहीहंडी साजरी करणार अशी भूमिका मनसेच्यावतीने घेण्यात आली आहे. दरम्यान आज मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांनी आंदोल केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेत आल्यापासून तसेच सत्तेपुढे हिंदू हा शब्द दिसत नाही. ते विसरले आहेत. हिंदूंच्या सणांमध्येच कोरोना आठवतो का? असा सवाल करीत जाधवानी मुख्यमंतयांवर निशाणा साधला.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या भीतीने मागील वर्षीप्रमाणे यंदाही कृष्ण जन्माष्टमीदिवशी दहीहंडी उत्सवाला सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्याची राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मात्र असे असतानाही ठाण्यामध्ये मसने दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार असल्याचे सांगत आज भगवती मैदानावर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आंदोलनास सुरुवात केली. यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. यावेळी जाधव यांनी “आम्हाला दहीहंडी उत्सव नियमांचे पालन करुन साजरा करु द्यावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात हे लक्षात ठेवावे. सत्तेत आल्यापासून ते हिंदू शब्दच विसरले आहेत.
ठाण्यात दरवर्षी भगवती शाळेजवळच्या मैदानामध्ये मनसेकडून दहीहंडीचे आयोजन केले जाते. मात्र, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यावर बंदी घातल्याने दहीहंडी आयोजकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवसेनेला राजकारण करताना कोरोना आडवा येत नाही मात्र हिंदूंचे सण साजरे करताना कोरोनाचा प्रादुर्भाव होतो का? असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला आहे.