आम्ही हिंदुस्थानात आहोत की पाकिस्तानात? मनसेचे उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र

raj thackeray uddhav thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेने शिवसेना भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालीसा पठण केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्याच पार्श्वभूमीवर यशवंत किल्लेदार यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना खरमरीत पात्र लिहिले आहे. आम्ही हिंदुस्थानात आहोत की पाकिस्तानात हेच कळत नाही असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला

सन्माननीय उद्धवजी साहेब रविवारी रामनवमीचे औचित्य साधत महाराष्ट्र सैनिकांनी हनुमान चालिसा रथ यात्रेचे आयोजन केले होते. याचा शुभारंभ मंदिराप्रमाणे असणाऱ्या शिवसेना भवन इथून करण्यात आला. मात्र यावर सरकारने ती रथ यात्रा रद्द करत उलट आमच्यावर कारवाईचा बडगा उचलला. सदर रथ श्रीराम उत्सवाच्या ठिकाणी तसेच राम मंदिराच्या ठिकाणी लावला जाणार होता,” असं यशवंत किल्लेदार यांनी पत्रात सांगितलं आहे.

ज्यापद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले तसेच अत्याचार राज्याचे मुख्यमंत्री आमच्यावर करत आहेत, अशी आमची भावना झाली तर गैर काय? आम्ही सुद्धा हिंदू आहोत सेनाभवनला शिवसैनिक आणि मुख्यमंत्री मंदिर मानतात मग हनुमान चालीसा लावली तर इतका द्वेष का असावा. आम्ही हिंदुस्थानात आहोत की पाकिस्तानात हेच समजेनासे झालेय.

तुम्ही तुमच्या भाषणातून अनेकवेळा आम्ही जनतेच्या हितासाठी हिंदुत्वसाठी महाविकास आघाडी बरोबर एकत्र आलो असल्याचे वक्तव्य केलेत. आमचा मुद्दा एकच जर तुम्ही हिंदुत्वसाठी एकत्र आलात तर मग मनसैनिकांनी हनुमान चालीसा वाजवील्यावर तुम्हाला कारवाई का करावीशी वाटली? जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात, मग सतत आम्ही हिंदुत्व सोडले नाही असे का बोलावे लागते याचे उत्तर आपण द्याल का?,” असा सवाल त्यांनी विचारला आहे.

आमचा कुठल्याही धर्माबद्दल अथवा त्यांच्या प्रार्थनेला विरोध नाही मात्र ते ज्या पद्धतीने एकतर्फी कारवाई होत आहे, त्या पद्धतीला विरोध आहे. एरवी आम्ही रमजानच्या दिवसात मुस्लिम बांधवांच्या घरी जातो तसेच गणेशोत्सवात ते आमच्या घरी येतात,” असं त्यांनी सांगितंल आहे.

“मी संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही अशी टीका टिपणी आदित्य यांनी केली मग पक्ष संपलेला असेल तर तुम्हांला कारवाईचा आधार का घ्यावा लागतो. मनसेच्या वसंत मोरे यांना फोन का करावा लागतो? गेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्या मित्राच्या फोनवरून मला पक्षात येण्यासाठी फोन करण्याची गरज का भासली? करोडो रुपये खर्च करून नगरसेवक का पळवावे लागतात?,” असे सवाल यशवंत किल्लेदार यांनी उद्धव ठाकरेंना केला.