Saturday, March 25, 2023

राज ठाकरेंना पत्र लिहित मनसेच्या बड्या नेत्याचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’; दिलं ‘हे’ कारण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महापालिका निवडणुकीचे वातावरण तयार झाले असून केव्हाही निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधीच मनसेच्या दिग्गज नेत्याने राजीनामा दिल्याने राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. मनसेचे नेते मनिष धुरी यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

अंधेरी येथील विभागाचे मनीष धुरी हे मनसेचे अध्यक्ष आहेत. मनीष धुरी राज ठाकरेंचे भारतीय विद्यार्थी सेनेपासूनचे कट्टर समर्थक मानले जातात. मनसेच्या अनेक आंदोलनात मनीष धुरी यांचा सहभाग आहे. मात्र अचनाक मनीष धुरी यांनी आपल्या सर्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

राज साहेब वैयक्तिक कारणामुळे सर्व पदांचे राजीनामे देत आहे. पक्षात यापुढे राज ठाकरे समर्थक म्हणून काम करेल, अन्य राजकीय पक्षात जाणार नसल्याचे मनीष धुरी यांनी या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, मनीष धुरी यांच्या राजीनाम्यामागे पश्चिम उपनगरात पक्षांतर्गत असलेली गटबाजी जबाबदार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.