मुंबई प्रतिनिधी | जगभरात कोरोना व्हायरसची दहशत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गरज पडल्यास संपूर्ण राज्यात सरकारी कर्फ्यू जारी करावा, असे आवाहन सरकारला केले आहे. राजू पाटील म्हणाले, “महाराष्ट्राची इटली होऊ द्यायची नसेल,आणि जर जनतेला केलेले ‘स्वयंशिस्ती’चे आवाहन काम करणार नसेल तर सरकारला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. गरज पडल्यास संपूर्ण राज्यात ‘सरकारी कर्फ्यू’ जाहीर करावा.”
दरम्यान चीनमधील व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 195 पर्यंत पोहोचली आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही रोज वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली आहे. तसेच, पाच जणांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याची दिलासादायक माहितीही त्यांनी दिली आहे.
महाराष्ट्राची #Italy होऊ द्यायची नसेल,आणि जर जनतेला केलेले ‘स्वयंशिस्ती’ चे आवाहन काम करणार नसेल तर सरकारला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. गरज पडल्यास संपूर्ण राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा.#coronavirus @CMOMaharashtra @rajeshtope11
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 20, 2020
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.
या बातम्याही वाचा –
करोनाविरुद्धच्या लढाईत बॉलीवूडकर आले समोर; पहा व्हिडिओ..
कोरोनाच्या संकटात माणुसकी सोडू नका – मुख्यमंत्री ठाकरे
जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंद राहणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
व्हिडिओ: ऐका हो! करोना पोवाडा..कोल्हापूरच्या शाहिराचा अनोखा जनजागृती पोवाडा
लोकलच्या गर्दीत केवळ ३० टक्के घट; लोकल बंद करण्याचा आरोग्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा