मरकजच्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे, उपचार कसले करता – राज ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “डॉक्टरांना त्रास देणाऱ्या मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यावर उपचार कसले करता? यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांचे वैद्यकीय उपाचार बंद करायला हवे. लोकांच्या अंगावर थुकतायत म्हणे हे, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच,” असं राज ठाकरेंनी यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुस्लिम समाजातील काही लोक संशयाची परिस्थिती निर्माण करत आहेत. निवडणुकीच्या वेळी मुल्ला-मौलवी लोकांना मतदानाबद्दल सांगतात मग आज का प्रबोधन करत नाहीत असा सवाल राज यांनी उपस्थितीत केला आहे. सर्वात मोठी जबाबदारी आज समाजाची आहे. केवळ यंत्रणांना दोष देऊन चालणार नाही. लॉकडाउनची शिस्त पाळा अशी माझी विनंती आहे. यंत्रणेवर ताण आला तर सरकारवर होईल. त्यामुळे उद्योगधंद्यावर परिणाम होईल, नोकऱ्या जातील. हे सगळं आपल्या एका चुकीमुळे होणार आहे असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”