मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला.
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यंच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या कार्यक्रमाला भाजपचे काही नेते, पत्रकार उपस्थित होते.एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होण्यास इच्छूक नव्हते. पण भाजपच्या वरिष्ठांनी आग्रह केल्याने त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली.
राज ठाकरे काय म्हणाले?
या शपथविधीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे अभिनंदन केले आहे. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल हि आशा. आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पावले टाका. पुन्हा एकदा अभिनंदन असे राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
हे पण वाचा :
शिवसैनिक आक्रमक!! श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले
आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं
हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल