असंच सहकार्य मिळाल्यास आपण एकत्रितपणे या संकटावर मात करु; राज ठाकरेंनी मानले मोदींचे आभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आणि देशात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना लसीचा तुटवडा लक्षात घेऊन केंद्र सरकारने हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळाल्यास आपण एकत्रितपणे या संकटावर मात करु, असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

100 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की, असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे.

हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी गुरूवारी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना परवानगी बाबत एक पत्र पाठवले आहे. “सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी” असे या पत्रात म्हटले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment