हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता आणि शिरीष सावंत आदी होते. या सर्वांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन 10 ते 15 मिनिटं चर्चा केली. वाढीव वीज बिलासंबंधी राज ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली.यासंदर्भात पवार साहेबांशी बोलून घ्या अस राज्यपालांनी सांगितलं असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
वाढीव वीजबिलासंदर्भात पहिलं निवेदन राज्यपालांना दिलं आहे. राज्यपालांशी वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चा केली. राज्यपालांशी बोलल्यानंतर ते बोलले पवार साहेबांशी बोलून घ्या, मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या, पवारांना मी फोन करणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. सर्वसामान्यांना येत असलेल्या वाढीव वीजबिलाच्या विषयावर राज ठाकरेंनी राजभवन येथे जात राज्यपालांची भेट घेतली.
जिथे 2 हजार बिलं येत होती तिथे लोकांना 10 हजार बिलं आता येत आहेत. त्यासाठी पहिलं निवेदन राज्यपालांना दिलं आहे. कुठली गोष्ट सांगितल्यावर काम चालू आहे, असं सांगितलं जातं, पण त्यावर निर्णय होत नाही. ही पाच पट, सहा पट बिलं बेरोजगारांनी कुठून भरावीत ते सांगा. लवकरात लवकर निर्णय होईल, अशी आशा असल्याचंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’