व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज ठाकरेंचा नेम फक्त राष्ट्रवादीवर? भाजपचा उल्लेखही केला नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथील मनसेच्या उत्तर सगळे राज्यातील महा विकास आघाडी आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर चौफेर टीका केली सुप्रिया सुळे, जयंत पाटील,ते थेट शरद पवार अशा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर राज ठाकरेंनी टीकेची झोड उठवली. विशेष म्हणजे आपल्या संपूर्ण भाषणात राज ठाकरे यांनी भाजपवर ना कोणती टीका केली ना साधा उल्लेखही केला.

शरद पवार हे नास्तिक आहे त्यांना देव धर्माबद्दल काही वाटत नाही. शरद पवार यांचा देवाला नमस्कार करतानाचा देवळातला फोटो आपण कधी बघितला आहे का? असा सवाल करत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीय द्वेष निर्माण झाला असेही म्हटलं. राष्ट्रवादीच्या जन्मानंतरची राज्यात संभाजी ब्रिगेड सारख्या संघटना निर्माण झाल्या असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण भाजपला फायदा होईल असेच होते विशेष म्हणजे यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा कौतुक केले. मोदींना माझ्या दोनच मागण्या आहेत पहिली म्हणजे संपूर्ण देशात समान नागरी कायदा अंमलात आणा आणि दुसरी म्हणजे बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये विकास करा जेणेकरून तेथील नागरिक महाराष्ट्रात नोकरीसाठी येणार नाहीत असे राज ठाकरे यांनी म्हंटल.

एकेकाळी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर जोरदार टीका केलेले राज ठाकरे यांनी अचानक यु- टर्न घेत मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला तर दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडीवरच निशाणा साधला. त्यामुळे प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष… याचा थेट फायदा आपोआपच भाजपला होणार यात शंकाच नाही.