हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना आणि न्यूमोनिया याची एकत्र लागण झालेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. याच दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीने ब्रीच कॅंडीत रुग्णालयात दाखल झाले आहे.
राज ठाकरे आणि मंगेशकर कुटुंब यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामूळेच लता दीदींची तब्बेत खालावताच राज ठाकरे हे तातडीने रुग्णालयात दाखल होऊन त्यांनी लता मंगेशकर यांच्या तब्बेतीची चौकशी केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लता दीदींच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. दरम्यान टोपे यांनी सांगितले होते कि, लता दीदी आता कोरोनामुक्त झाल्या असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. यानंतर लता दीदींच्या प्रमुख प्रवक्त्यांनीदेखील लता दीदींच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले होते. यानंतर आज अचानक लता मंगेशकर यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.