हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत, असा आरोप मनसे नेते देशपांडेंनी केला आहे. तसेच अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का?” असा सवाल संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे.
अधिवेशनाच्या तोंडावरच सरकार कडून कोरोना रुग्णांचे आकडे जाहीर करण्यात आले. यापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक लढताना याना कोरोना नाही झाला का…दिल्ली मध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत तिकडे कोरोना आला नाही का …अधिवेशन घ्यायचं नाही म्हणून सरकार कडून हे सर्व पध्दतशीर पणे सुरू आहे असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला.फक्त अचानक अमरावतीमध्ये आकडे कसे वाढले? अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? हा तर सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्याचं मुख्यमंत्र्यांना काही वाटत नाही का?” असंही संदीप देशपांडेंनी विचारलं
मुख्यमंत्री साहेबाना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का? तुम्हाला घरी बसायचं आहे तर बसा पण लोकांना लॉकडाऊनची भीती दाखवू नका.” असं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’