शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ टीम’; मनसेचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात शिवसेना आणि ठाकरे सरकारवर टीका केल्यानंतर शिवसेना आणि मनसे मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला भाजपची सी टीम म्हणल्यानंतर आता मनसेकडूनही शिवसेनेवर पलटवार करण्यात आला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेना हि राष्ट्रवादीची ढ टीम आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. ज्या पद्धतीने यांचा भ्रष्टाचार चालू आहे, आता हजारो कोटी रुपयांचा हिशोब ईडीला द्यायचा आहे. काय केलं, कुठे कुठे पैसे खाल्ले याचा हिशोब ईडी मागत आहे. त्यामुळे ईडीला हिशोब कसा द्यावा, यावर आदित्य ठाकरेंनी लक्ष द्यावं. आमच्याबद्दल बोलण्याची गरज नाही. तुमच्यावर जी ईडीला हिशोब द्यायची वेळ आली आहे, ते नीट करा अशी टीका संदीप देशपांडेंनी केली.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले

मनसे ही भाजपची सी टीम आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी साम टीव्हीच्या एका कार्यक्रमात बोलताना केली होती. मनसेचे राजकारण हे टाईमपास राजकारण आहे. तसंच टाइमपास टोळीला काम मिळालं हे पाहून बरं वाटलं असा टोलाही लगावला.तसेच जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं याचा विचार केला पाहिजे असंहीआदित्य ठाकरे म्हणाले.