राऊतांकडून राज ठाकरेंचा ‘ओवेसी’ असा उल्लेख; मनसेने फोडलेल्या गाडीची आठवण करून देत दिला गंभीर इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज ठाकरे हे महाराष्ट्रात भाजपसाठी ओवेसींची भूमिका करत आहेत असा थेट आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर मनसे आक्रमक झाली असून सामनाच्या कार्यालयाबाहेर पोस्टरबाजी करत मनसेने संजय राऊत यांना इशारा दिला आहे. तसेच एकेकाळी संजय राऊतांच्या फोडलेल्या गाडीचा पोस्टर लावून तुम्हांला याची पुनरावृत्ती हवी का? असा सवालही केला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि मनसे मध्ये जोरदार लढाई पाहायला मिळेल.

ओबीसी कोणाला बोलता संजय राऊत? तुमचा कर्कश भोंगा बंद करा.. त्याचा त्रास संपूर्ण महाराष्ट्राला होतोय, नाहीतर मनसे स्टाईल तुमचा भोंगा आम्ही बंद करू असा थेट इशारा मनसेने संजय राऊत यांना दिला. एवढंच नव्हे तर मनसेच्या स्थापनेच्यावेळी जेव्हा संजय राऊत स्वत: राज ठाकरे यांची समजूत घालण्यासाठी कृष्णकुंजवर गेले होते. यावेळी आक्रमक मनसैनिकांनी संजय राऊत यांची गाडी पलटी केली होती. या घटनेचा फोटोही बॅनरवर लावला आहे. या घटनेची पुनरावृत्ती व्हावी का? असा इशारा ही मनसैनिकांनी या राऊताना दिला आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले-

राज ठाकरे हे महाराष्ट्रात भाजपसाठी ओवेसींची भूमिका करत आहेत, भाजपने उत्तरप्रदेशात जे ओवेसींकडून करून घेतलं तेच ते आता महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या कडून केलं जातं आहे. राज ठाकरे जी भूमिका घेतात, राज्यातील नेत्यांवर टिका करतात, त्याचा अर्थ जनतेला कळत नाही असे त्यांनी सम जू नये. बाळासाहेबाचे शिवसैनिक हेच खरे हिंदूंचे रक्षणकर्ते आहेत असे संजय राऊत यांनी म्हंटल.