मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची चर्चा झाली असून मनसे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याचे म्हटले जात आहे. मनसे फक्त महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे.
मनसे काँग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडीत समाविष्ट होणार का नाही हा प्रश्न अजून उलगडला नाही. मात्र मनसे लोकसभा निवडणूक न लढता फक्त विधानसभेची निवडणूक लढण्यास उत्सुक आहे. लोकसभेच्या रिंगणात मनसे उतरणार नसले तरी सरकारला पाडण्यासाठी मनसे महाआघाडीला मदत करणार असल्याचे म्हटले आहे.
मनसेचे विचार काँग्रेसशी जुळत नसल्याने काँग्रेसने मनसेला महाआघाडीत घेण्यास नकार दिला होता. राहुल गांधी यांनी मुंबई येथील सभेत सरकारविरोधी जे पक्ष सोबत येतील त्यांना हिरवा कंदील दाखविला होता. मात्र अशोक चव्हाण यांच्यामुळे मनसेला महाआघाडीतील प्रवेशची दारे बंद झाली आहेत.
इतर महत्वाचे –
दुष्काळाबाबत सक्त अंमलबजावणी करण्याच्या सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
भाजपच्या नगरसेविका आणि आयुक्तांमध्ये जोरदार वादावादी : हे आहे महत्वाचं कारण