पंढरपूर पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा; भगीरथ भालकेंचा प्रचार करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर -मंगळवेढा पोटनिवडणुक सध्या जोरदार चर्चेत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान अवताडे यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांनी याबाबत माहिती दिली. तसेच मनसेचे नेते मतदारसंघात फिरून भगीरथ भालके यांचा प्रचारही करणार आहेत.

या निवडणुकीसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरू आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पंढरपूरमध्ये सभा घेत असून राष्ट्रवादी काँग्रेस आपला हा गड राखणार का हे पाहायला हवं.

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर विधानसभा जागा रिक्त झाली होती. आणि भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनाच ही उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विजय सोपा वाटत आहे. तसेच भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने हा भाजपला खूप मोठा धक्का मानला जात आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like