हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज गुन्हा दाखल झाला आहे. त्यांची दोन दिवसापूर्वी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. या सभेला पोलिसांनी घालून दिलेल्या अटी शर्तींचे त्यांनी पालन न केल्यामुळे त्यांच्यावर औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल होताच मनसेचे सरचिटणीस यांनी संदीप देशपांडे यांनी मनसेच्या वतीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “जेव्हा पोलिसांनी 16 अटी टाकल्या होत्या, तेव्हाच आम्हाला कळले होते. पोलीस या प्रकरणी कारवाई करणार याची आम्हाला कल्पना होती, असे देशपांडे यांनी म्हंटले आहे.
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्हाला अगोदरपासून कल्पना होती कि पोलिसांकडून सभेच्या नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कारवाई केली जाणार म्हणून. अशा प्रकारे कारवी करून सरकारला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर दबाव निर्माण करायचा आहे, हेच यातून स्पष्ट होत आहे.
पोलिसांकडून या कलमांतर्गत गुन्हा दाखल?
औरंगाबादमधील सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या 16 पैकी 12 अटींचे उल्लंघन केल्याबद्दल राज ठाकरे याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवला असून त्यासाठी कलम 116, 117, 153 यांचा वापर करण्यात आलेला आहे. या विरोधात राज्यभरातील मनसे नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.