नालासोपारा : हॅलो महाराष्ट्र – आपण आतापर्यंत मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट (Blast) झाल्याचे ऐकले असेल, मात्र आता याच मोबाईलच्या स्फोटामुळे (Blast) मोबाईलच्या दुकानांना आग लागली आहे. या स्फोटात (Blast) एकदोन नाहीतर 4 ते 5 दुकानं आगीत जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नालासोपारा पूर्वेकडील जाधव मार्केटमधील ही धक्कादायक घटना घडली आहे.
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने दुकानं आगीच्या विळख्यात आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशनम दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नालासोपारामध्ये मोबाईलची 4-5 दुकाने जळून खाक, Video आला समोर pic.twitter.com/SCEAR4YqMK
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 29, 2022
पालघरमध्ये केमिकल कंपनीत स्फोट
बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात औरा ऑइल या बंद असलेल्या कंपनीत गॅस कटरच्या सिलेंडरचा ब्लास्ट होऊन भीषण आग (Blast) लागली. बंद असलेल्या कंपनीत गॅस कटरच्या सहाय्याने कंपनीतील साहित्याची चोरी करत असताना हा ब्लास्ट झाला. या आगीमध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर बोईसर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय