नवी दिल्ली वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्लीत राजकीय वर्तुळात चर्चा आहे की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामधून महाराष्ट्र मधून प्रीतम मुंडे आणि नारायण राणे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर दोन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदा मोदी सरकार मध्ये अनेक मंत्र्यांकडून मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी आहे. त्यामुळे जबाबदारी कमी करण्याकरिता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार करण्याची चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री यांसोबत तीन-चार वेळा सल्लामसलत केली असल्याची माहिती पुढे आली आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सोबत जवळपास पाच ते सहा तास केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे.
महाराष्ट्राच्या खात्यामध्ये सध्या सहा मंत्री आहेत. यापैकी दोन मंत्र्यांना डच्चू देण्यात संदर्भात चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा आहे. सोबतच काही कॅबिनेट मंत्र्यांची अतिरिक्त जबाबदारी मांडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर काहींचा खाते बदल करण्याची देखील चर्चा आहे.