हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना विरोधातील रणनीतीवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ‘‘केंद्र सरकारची कोविड रणनीती- पहिला टप्पा- तुघलकी लॉकडाउन लावणे. दुसरा टप्पा- घंटी वाजवणे. तिसरा टप्पा- देवाचे गुण गा,’’ असा आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी लस महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. टाळी-थाळी, उत्सव खूप झाले, आता देशाला लस द्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
केंद्र सरकार की कोविड रणनीति-
स्टेज 1- तुग़लक़ी लॉकडाउन लगाओ।
स्टेज 2- घंटी बजाओ।
स्टेज 3- प्रभु के गुण गाओ।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 16, 2021
यातच काँग्रेस सरचचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी लोकांना आवाहन केले आहे, की ‘‘प्रीय देशवासियांनो, हा काळ आपल्या सर्वांसाठीच संकटाचा काळ आहे. आपल्या सर्वांचे प्रिय लोक, कुटुंबीय, जवळपासचे लोक कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आपल्या सर्वांना विनंती करते, की मास्क लावा आणि कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करा. ही लढाई आपण सावधपणे जिंकायला हवी.’’