हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविरोधात बॅनरबाजी पाहण्यात येत आहे. मोदी हटाओ देश बचाओ अशा आशयाचे पोस्टर्स ठिकठिकाणी पहायला मिळत आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलीस ऍक्शन मध्ये आले असून तब्बल 100 जणांवर पोलिसांनी FIR दाखल केलाय. तसेच आत्तापर्यन्त 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
दिल्लीतील पटेल नगर भागात ‘मोदी हटाओ देश बचाओ’चे पोस्टर लावण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मंगळवारी एक व्हॅन थांबवून तब्बल 10,000 हून अधिक मोदीविरोधी पोस्टर्स जप्त केले. तसेच दिल्लीच्या काही भागात भिंतींवर लावलेले ‘मोदी हटाओ देश बचाओ’ पोस्टर्स सुद्धा हटवण्यात आले आहेत. यातील एकाही पोस्टरवर प्रिंटिंग प्रेसचे नाव नव्हतं. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 100 एफआयआर दाखल केले असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
मोदी सरकार की तानाशाही चरम पर है‼️
इस Poster में ऐसा क्या आपत्तिजनक है जो इसे लगाने पर मोदी जी ने 100 F.I.R. कर दी?
PM Modi, आपको शायद पता नहीं पर भारत एक लोकतांत्रिक देश है।
एक पोस्टर से इतना डर! क्यों? pic.twitter.com/RLseE9Djfq
— AAP (@AamAadmiParty) March 22, 2023
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या या कारवाई नंतर आम आदमी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आप ने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून ट्विट करत म्हंटल की, केंद्र सरकारची कारवाई म्हणजे तानाशाहीचा प्रकार आहे. मोदी सरकारची तानाशाही आता शिगेला पोचली आहे. या पोस्टरमध्ये एवढं काय आक्षेपार्ह आहे की मोदीजींनी 100 जणांवर FIR दाखल केलाय? मोदीजी, कदाचित तुम्हाला माहित नसेल पण भारत हा लोकशाही देश आहे असे म्हणत आम आदमी पार्टीने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.