मोदीजी टाळ्या-थाळ्या खूप झालं, आता व्हॅक्सिन द्या; राहुल गांधींची खोचक टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाचा कहर प्रचंड वाढला आहे. दिवसाला दीड दीड लाख नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मोदीजी टाळ्या-थाळ्या खूप झालं, आता व्हॅक्सिन द्या; राहुल गांधींनी ट्विट करून खोचक टीका केली आहे.

385 दिवसातही कोरोना विरुद्धचं युद्ध जिंकता आलेलं नाही. उत्सव, टाळ्या-थाळ्या आता खूप झाल्या. आता लोकांना व्हॅक्सीन द्या, असा खोचक टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. सरकारच्या धोरणांमुळेच देशातील प्रत्येक वर्ग त्रस्त आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. दुसरीकडे लसींची कमतरता जाणवत आहे. शेतकरी-मजदूर संकटात आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. छोटे उद्योग धंदे बंद होत आहेत. मध्यमवर्गही त्रस्त झाला आहे, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

लसींची निर्मिती करणाऱ्या आवश्यक ती साधनसामुग्री पुरवली पाहिजे. त्यांना सुविधा द्या, म्हणजे लसीचं उत्पादन वाढेल. सध्याच्या गतीने लसीकरण सुरू राहिलं 75 टक्के लोकसंख्येचं लसीकरण करण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असंही ते म्हणाले. पोकळ दावे, वायफळ बडबड आणि मोठमोठ्या गप्पा झोडल्याने कोरोना संसर्गाच्या विरोधात यश मिळणार नाही. आपलं अपयश लपवण्यासाठीच सरकार व्हॅक्सीनच्या पुरवठा आणि वितरणाच्या नियोजन व्यवस्थित करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

You might also like