भारत जोडो यात्रेत मोदी- मोदींचा नारा; राहुल गांधीनी Flying Kiss देत दिले प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये एंट्री करत आहे, त्याच दरम्यान, राहुल गांधींचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये काही लोकांकडून मोदी मोदी असा जयघोष सुरु असताना राहुल गांधींनी मात्र फ्लाईंग किस देत भाजप समर्थकांना प्रत्युत्तर दिले आहे.

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी काँग्रेस नेत्यांसोबत चालत असताना रस्त्याच्या कडेला उभे असलेले काही भाजप समर्थक मोदी-मोदीच्या घोषणा देऊ लागले. यावर रागावण्याऐवजी राहुल गांधी समर्थकांना फ्लाइंग किस देऊ लागले. ही घटना काही लोकांनी कॅमेऱ्यात कैद केली केली असून आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राहुल गांधींच्या यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा प्रेमाचा संदेश दिला आहे.

दरम्यान, कन्याकुमारी पासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा सध्या मध्यप्रदेशातून राजस्थान मध्ये पोचली आहे. यावेळी राहुल गांधींसोबत काँग्रेसच्या एमपी युनिटचे प्रमुख कमलनाथ आणि पक्षाचे इतर नेतेही सहभागी झाले होते. राजस्थान हा काँग्रेसचा गड मानला जातो. भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये पोचताच येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी या यात्रेचे जल्लोषात स्वागत केले. राहुल गांधींनी यावेळी राहुलने अशोक गेहलोत आणि कमलनाथ यांच्यासोबत डान्सही केला.