‘मोदीजी को भगवान मानते थे…हम डूब गए’; मदतीसाठी रडणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

व्हायरल बिरबल । पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या कटआउट्सच्या पुढ उभं राहून मदतीसाठी याचना करत रडणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. ”हम मोदीजी को भगवान मानते थे, उनको वोट दिया…अब हम डूब गए है, लूट गए है ..हमारी मदद करों..” अशी याचना करत ही महिला रडत असलेली व्हिडिओत दिसत आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

काही जणांनी व्हिडिओ शेअर करताना ही महिला पीएमसी बँकेची खातेदार असल्याचा दावा केला आहे. भाजपच्या कार्यालयात जाऊन त्या महिलेनं मदतीची याचना केल्याचं देखील सांगण्यात येत आहे. मोदींच्या कटआउट्चे पाय धरून मदतीची याचना करताना ही महिला, ‘विदेशात जाऊन तुम्ही मदत करता. आमचंही भलं करा. आम्ही तुम्हाला मतं दिली आहेत. भीक मागायची वेळ आली आहे. आमचा पैसा मिळवून द्या.’ असं म्हणत आहे. तर त्यानंतर दुसऱ्या खोलीत बसलेल्या कार्यकर्त्यांकडे जाऊन ‘इतकं मोठं ऑफिस उघडून बसला आहात, मग आम्हाला मदत करा’, असंही ही महिला बोलत असताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडियो पाहण्यासाठी लिंक –