नवी दिल्ली |पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळाला अंतिम रूप देण्यात आले असून ज्यांना मंत्री मंडळात समाविष्ट केले आहे अशा खासदारासोबत नरेंद्र मोदी त्यांच्या शासकीय निवास स्थानी आज चहा पाणी करणारा आहेत. हा चहा पाण्याचा कार्यक्रम आज ठीक ४. ३० वाजता पार पडणार असून नरेंद्र मोदी यावेळी आपल्या मंत्री मंडळात समाविष्ट होणाऱ्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत.
नरेंद्र मोदी प्रत्येक घटक पक्षाच्या एका खासदाराला मंत्रिपद देणार आहेत. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातून शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार आहे. तर नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अनुप्रिया पटेल, प्रकाश जावडेकर, निर्मला सीतारामन, मुक्तार अब्बास नखवी, गिरीराज सिंह आणि रामदास आठवले यांना पुन्हा मंत्री पदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्राच्या पियुष गोयल यांना अर्थमंत्री पदाची लॉटरी लागण्याची देखील शक्यता आहे.
तर अमित शहा, रावसाहेब दानवे,कृष्णपाल रुपाला, पुरषोत्तम गुजर आदी नेत्यांना नव्याने मोदींच्या मंत्री मंडळात संधी दिली जाणार आहे. मोदींच्या शपथ विधीची सर्व तयारी झाली असून नरेंद्र मोदी यांनी आमंत्रित केलेले विविध देशांचे राष्ट्र प्रमुख देखील शपथ विधी सोहळ्यासाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.