महाविकास आघाडीचा उमेदवार पडला तर….; निकालापूर्वी मोहित कंबोज यांचे ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान पार पडले. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणार असल्यामुळे या निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळाली. दरम्यान भाजप नेते मोहित कंबोज यांनी सूचक असे एक ट्विट केले आहे. ‘विधान परिषद निवडणुकीसाठी आज 285 मतदान झाले. सरकार बनवण्यासाठी जादूई आकडा 143 आहे. आज उद्धव ठाकरे यांचं रिपोर्ट कार्ड येणार आहे, असे ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे.

मतदानानंतर आता महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांकडूनही विजयाचा दावा केला जात आहे. मतमोजणीपूर्वी मोहित कंबोज यांनी ट्विट केले असून त्यांनी म्हंटले आहे की, ‘विधान परिषद निवडणुकीसाठी आज 285 मतदान झाले. सरकार बनवण्यासाठी जादूई आकडा 143 आहे. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. अशावेळी उद्धव ठाकरे सरकारला किती मतं पडणार ते पाहू.. आज उद्धव ठाकरे यांचं रिपोर्ट कार्ड येणार,’ असे कंबोज यांनी म्हंटले आहे.

आता राज्यसभेच्या निवडणुकीवेळी भाजपने काही नेत्यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. आता विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसनेही भाजपच्या दोन नेत्यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली मात्र, त्यांचा अर्ज आयोगाने फेटाळून लावला आहे. अशावेळी भाजप नेते मोहित कंबोज यांनी सूचक ट्विट केल्यामुळे विधान परिषदेतही महाविकास आघाडीला झटका बसणार का? हे पहावे लागणार आहे.

Leave a Comment