हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Money Saving Tips) महिनाभर मरमर काम करून, बॉसची बोलणी खाऊन, कामाचं प्रेशर घेऊन जेव्हा ठरलेल्या तारखेला अकाउंटमध्ये सॅलरी जमा होते, तेव्हाचा आनंद काही औरच असतो. बँकेतून सॅलरी जमा झाल्याचा मॅसेज पडला की क्षणभर का होईना मन सुखावत. पण दुसऱ्या मिनिटाला पैशाशी संबंधित जबाबदाऱ्या आठवू लागतात. विविध प्रकारची बिल, घरातला किराणा, लोनचे हफ्ते आणि इतर बरंच काही. अशी एक एक जबाबदारी जशी पार पडत जाते तसतसं अकाऊंट हळूहळू करून कधी पूर्ण रिकामी होतं समजत नाही.
तसच पाकिटातले पैसे आज आहेत तर उद्या नाहीत, असेही अनेकदा घडते. साधारण पगार झाल्यापासून पुढच्या ५ दिवसांतच सगळे पैसे संपतात आणि चातक पावसाची जशी वाट पाहतो तसे आपण पुढच्या पगाराची वाट पाहू लागतो. (Money Saving Tips) तुमच्याही बाबतीत असंच घडत का? तुमच्याही हातात, पाकिटात, बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे टिकत नाहीत? तर फिकीर नॉट. आज आपण वाढत्या खर्चासोबत पैशाची बचत कशी करता येईल? यासाठी काही टिप्स जाणून घेणार आहोत. ज्यामुळे पगार कमी असला आणि जबाबदाऱ्या जास्त असल्या तरीही पैशाची बचत होईल आणि आर्थिक चणचण जाणवणार नाही.
कमी पगारातूनही करता येते बचत (Money Saving Tips)
अनेक लोकांचा पगार कमी असतो आणि जबाबदाऱ्या जास्त. मग अशावेळी बचत कशी होणार? हा एक मोठा प्रश्न ठरतो. आता समजा तुमचा पगार दरमहा २० हजार रुपये असेल, तुमच्यावर आर्थिक जबाबदाऱ्या असतील आणि तरीही तुम्ही बचत करू शकलात तर? चांगल आहे ना? यासाठी काय कराल तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पगार जमा झाला की बचतीच्या हिशोबाने काही निश्चित रक्कम लगेच दुसर्या अकाउंटवर ट्रान्सफरकरा. समजा तेव्हढी रक्कम आलीच नव्हती.
आता जर तुमचं दुसऱ्या बँकेत अकाउंट नसेल तर बचतीसाठी निश्चित करून बाजूला केलेल्या रकमेतील एकही रुपया काही झालं तरी खर्च होणार नाही, याची काळजी घ्या. (Money Saving Tips) जर तुम्हाला पगारातून मोठी रक्कम बाजूला करणे शक्य नसेल तर सुरुवातीला केवळ १०% रक्कम बाजूला करा. मग पुढे पुढे काटकसरीची सवय लागेल तशी आणखी काही रक्कम थोडी थोडी बाजूला करा. पहिले ६ महिने चांगला जम बसला की पुढच्या महिन्यात ५०० रुपये वाढवा. म्हणजे बचतही होईल आणि आर्थिक ताण देखील येणार नाही.
अनावश्यक खर्च टाळा
बऱ्याच लोकांना पगार झाला की शॉपिंग, हॉटेलात जेवणे, सिनेमा पाहणे, मिञरांसोबत पार्ट्या करणे अशा सवयी असतात. आता तुमचा पगार जर कमी असेल आणि त्यात तुमच्यावर आर्थिक जबाबदाऱ्या असतील तर असे खर्च तुमच्या खिशाला कात्री लावणारे ठरू शकतात. (Money Saving Tips) सुरुवातील ६ महिने १०% मग पुढच्या महिन्यापासून ३०% अशी बचत करताना मध्येच केले जाणारे हे अनावश्यक खर्च तुमच्या डोक्याला ताप होऊ शकतात. त्यामुळे सर्वात आधी अनावश्यक खर्च टाळा.
जिथे चार वेळा बाहेर खाता तिथे दोन वेळा खा. जिथे प्रत्येक महिन्यात शॉपिंग तिथे २-४ महिन्यातून एकदा करा. याशिवाय क्रेडिट कार्डचा वापर, ऑनलाइन शॉपिंग करणे टाळा. खरेदीसाठी बाहेर पडताना निश्चित रक्कम घेऊन बाहेर पडा म्हणजे अनावश्यक वस्तूंची खरेदी होणार नाही आणि पैसे वाचतील.
वाचवलेली रक्कम चांगल्या योजनांमध्ये गुंतवा
प्रत्येक महिन्याला पगारातून जेव्हढी रक्कम वाचवता येईल तेव्हढी वाचवा. अशी हळूहळू तुम्ही केलेली बचत कालांतराने मोठी रक्कम ठरेल. ही रक्कम सरकारी योजनांमध्ये गुंतवा. आपण गुंतवणूक करत असलेल्या योजनेची पूर्ण माहिती घेऊन बचत केलेली रक्कम गुंतवा आणि चांगला परतावा घ्या. (Money Saving Tips) जर एखादी व्यक्ती महिन्याला १ लाख रुपये पगार घेत असेल आणि महिन्याला ३० हजाराच्या आसपास बचत करत असेल तर ती व्यक्ती वर्षभरात ३.६० लाख रुपये वाचवू शकेल. इतकेच काय तर यातील 10 हजार रुपये आपत्कालीन निधी म्हणून देखील ठेवता येईल.
बचत केलेल्या रकमेबाबत सुरक्षा आणि उत्तम परताव्याचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंडातील एसआयपी कधीही फायदेशीर ठरेल. यामध्ये दरमहा १० हजार रुपये गुंतवता येतील. शिवाय रिकरिंग डिपॉझिटमध्ये किंवा गोल्ड बाँडमध्येदेखील गुंतवणूक कररा येईल. तुमचा पगार जेव्हढा असेल त्यानुसार गुंतवणुकीची रक्कम वाढवत राहा. यामुळे तुमच्या पैशाची बचत होईल आणि तुमचं अकाउंट कधीच रिकामी राहणार नाही. (Money Saving Tips)