हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना राबविल्या जातात. या योजनांद्वारे काही वर्षांत आपले पैसे सहजपणे दुप्पट होऊ शकतील. जर आपल्यालाही पैसे दुप्पट करायचे असतील तर आज आपण पोस्ट ऑफिसकडून देण्यात येणाऱ्या अशा योजनांबाबतची माहिती जाणून घेउयात….
हे लक्षात घ्या कि, या योजनांमध्ये पोस्ट ऑफिस बचत खाते, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट्स, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट,पोस्ट ऑफिस मंथली इन्कम प्लॅन, पोस्ट ऑफिस सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खाते, पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट सामील आहेत.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
Post Office च्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत, सुमारे 9.73 वर्षांत पैसे दुप्पट होतील. यामध्ये 7.6 टक्के दराने व्याजदर मिळेल.
टाइम डिपॉझिट
पैसे दुप्पट करण्यासाठी पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट ही सर्वोत्तम योजना आहे. यामध्ये 1-3 वर्षांपर्यंतच्या डिपॉझिट्सवर 5.8 टक्के व्याज दिले जाते. यामध्ये गुंतवणूक करून 13 वर्षांत पैसे दुप्पट होतील.
मंथली इनकम स्कीम
Post Office मंथली इनकम स्कीममध्ये गुंतवलेले पैसे सुमारे 10.91 वर्षांत दुप्पट होतात. यामध्ये 6.7 टक्के व्याज दर मिळेल.
बचत खाते
Post Office बचत खात्यातील पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 18 वर्षे लागतील. या योजनेला सर्वाधिक वेळ लागतो कारण त्याचा व्याजदर कमी असतो. यामध्ये ग्राहकांना 4 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
रिकरिंग डिपॉझिट
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमधील पैसे सुमारे 12.41 वर्षांत दुप्पट होतील. यामध्ये 5.8 टक्के दराने व्याजदर मिळेल.
पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट
Post Office च्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर 6.8 टक्के व्याज दर दिला जात आहे. या 5 वर्षांच्या या बचत योजनेमध्ये गुंतवणूक करून 10.59 वर्षांत पैसे दुप्पट होतील.
हे लक्षात घ्या कि,केंद्र सरकारकडून नुकतेच काही लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली गेली आहे. 1 ऑक्टोबरपासून ही दर वाढ लागू झाली आहे. त्यामुळे जर आपण गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्यायाच्या शोधात असाल तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना एक चांगला पर्याय ठरू शकेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा