Saturday, March 25, 2023

लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यास काय अडचण? कोर्टाने BMC ला खडसावलं

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उभं राहिलेल्या ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिकेतील राजीनामा अद्याप प्रशासनाने स्वीकारला नसल्याने त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी सुरु असतानाच सुरुवातीलाच कोर्टाने महापालिकेला धारेवर धरले आहे. लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यास नेमकी काय अडचण आहे? असा थेट सवाल करत हायकोर्टाने BMC ला फटकारले आहे.

न्यायालयाने पालिकेला राजीनामा स्वीकारणार की नाही? याबद्दल २.३० वाजता भूमिका मांडण्यास सांगितलं आहे. ऋतुजा लटके यांचे वकील विश्वजित सावंत यांनी जोरदार युक्तिवाद केला. ऋतूजा लटके २७ सप्टेंबर आणि ३ ऑक्टोबर अशा दोन वेळेला राजीनामा दिला होता. मात्र, अनेक दिवस होऊनही महापालिकेने त्यावर अजून निर्णय दिलेला नाही. राजकीय दबावापोटीच ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला जात नसल्याचा त्यांनी म्हंटल.

- Advertisement -

यावेळी वकील विश्वजित सावंत यांनी २०१२ सालच्या एका केसचा दाखला यावेळी दिला. हेमांगी वरळीकर यांनीही २०१२ साली निवडणूक लढवण्यासाठी अशाच पद्धतीने नोकरी सोडली होती. त्यावेळी त्यांचा राजीनामा एका महिन्याच्या आत मंजूर करण्यात आला होता. मग ऋतुजा लटके यांचा राजीनामा का स्वीकारला जात नाही, असा सवाल वकिलांनी केला.

यानंतर कोर्टाने महापालिकेला खडसावलं आहे. तुमच्याकडे विशेषाधिकार असताना अशी प्रकरणं आमच्याकडे येता कामा नयेत असं कोर्टाने म्हंटल आहे. तसेच लटके यांचा राजीनाम्यावर पालिका निर्णय घेणार आहे कि नाही हे कळवा असे कोर्टाने पालिकेच्या वकिलांना सांगितलं आहे.