नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचा समारोप करताना मॉब लीन्चींगच्या मुद्द्यावर बोट ठेवले आहे. मॉब लीन्चींग हि सामाजिक समस्या आहे. त्याचा विमोड निश्चित केला पाहिजे. दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे. मात्र या मुद्द्याचे राजकरण करणे उचित नाही दोषींवर खटला दाखल करून हा प्रकार न्यायपालिकेवर सोडला पाहिजे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
मागील वर्षी देशाच्या सर्वच भागात मॉब लीन्चींगची अनेक प्रकरणे घडली आहेत. या प्रकरणात बऱ्याच लोकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. या समस्येवर नरेंद्र मोदी कधीच बोलले नाहीत. मात्र त्यांनी आज राज्यसभेत या मुद्द्यावर आपले मत मांडले आहे. एका समस्येवरून संपूर्ण राज्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करता येत नसते. झारखंडमध्ये मॉब लीन्चींगचे अनेक प्रकार झाले याचा अर्थ पूर्ण राज्य दोषी असू शकत नाही. झारखंड राज्यात खूप चांगली माणसे जन्माला आली आहेत. आणि देशासाठी त्यांनी खूप चांगले काम केले आहे असे नरेद्र मोदी म्हणाले आहेत.
संपूर्ण देशात मॉब लीन्चींगची जणू लाटच आली होती. देशाच्या अनेक राज्यात मॉब लीन्चींगचे प्रकार समोर येत होते. महाराष्ट्रात देखील याचा शिकार होण्यापासून वाचला नव्हता. महाराष्ट्रात देखील धुळे जिल्ह्यात वैद समाजाच्या लोकांना मुले पळवणारी टोळी म्हणून ठार केले होते.