हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाचा प्रश्नी प्रलंबित असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यामध्ये आता मुस्लिम आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला नसल्याने सरकारच्या विरोधात 5 जुलै रोजी मुंबई येथील विधान भवनावर मोर्चाचे काढणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी मुबंईत पत्रकार परिषद घेत हि माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या आरक्षणावरून केल्या जात असलेल्या दिरंगाईबाबत संताप व्यक्त केला. तसेच मुस्लिम समाजाला आरक्षण न देणाऱ्या राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांचा सेक्युलर असा उल्लेख केला. आरक्षणाच्या प्रष्णांवर बोलताना आंबेडकर म्हणाले कि, मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण लागू करणे आवश्यक होत. मात्र, तसे केले गेले नाही. तस मराठा आरक्षणाप्रश्नी मात्र न्यायालयाने निर्णय दिला. आता काहीही झाले तरी मुंबईत विधान भवनावर मुस्लिम समाज बांधवांसाठी मोर्चाचे काढणार आहे.
आंबेडकर पदोन्नतीच्या आरक्षणाबाबत बोलताना म्हणाले कि, मुस्लिमी समाजातील लोकांसाठी ५ टक्के आरक्षण न्यायालयाने मान्य केले आहे हे या महाविकास आघाडी सरकारने जाहीर करून टाकावे. तसेच पदोन्नती आरक्षणाबाबत सध्या वाद सुरु आहे. तो सोडवायचा असेल तर इम्पिरिकल डाटा हा या सरकारने जमा करावा.