Monday, February 6, 2023

केंद्राकडून महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा सर्वाधिक पुरवठा; मुख्यमंत्र्यांनी मानले मोदींचे आभार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता राज्यासाठी येत दिलासादायक बाब समोर आली आहे. केंद्र सरकार कडून राज्याला सर्वाधिक रेमडेसीवीर इंजेक्शन पुरवण्यात आले आहेत. आज केंद्राने राज्यासाठी 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 35 हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी 2 लाख 69 हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून 4 लाख 35 हजार करण्यात आला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन पुरवठ्यासह महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचा विचार करता अधिक रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आकडेवारी सादर करून तातडीने मद9
त करावी अशी मागणी केली होती.

राज्यात 67,160  नवीन रुग्णांचे निदान

राज्य सरकारकडून गेल्या 24 तासांतील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.  आज राज्यात 67,160  नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टकके एवढा आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.