मुंबई । राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक झपाट्यानं वाढत असताना आता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारीही कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत. राज्यात एकूण ५०० डॉक्टरांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ५ डॉक्टरांचा करोनामुळं मृत्यू झाला असल्याची माहिती. महाराष्ट्र मेडिकल परिषद व इंडियन मेडिकल असोसिएशननं दिली आहे. तसेच जवळपास ३ हजार ५०० पेक्षा जास्त कोविड योद्ध्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे.
कोरोना युद्धात रात्रंदिवस सेवा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलालीही जीवघेण्या कोरोनाचा विळखा बसला आहे. १,५२६ पोलिसांना कोरोनाची लगान झाली आहे. यामध्ये १९० पोलिस अधिकारी व १,३२६ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात २९ पोलिसांचा करोनमुळं मृत्यू झाला आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्माचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत त्यातील बहुंताश जणांची व्यवस्था पालिकेनं हॉस्टेलमध्ये केली होती. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी केलेल्या नियोजनानुसार वेगवेगळ्या वेळांनुसार काम करणारे हे कर्मचारी रात्री हॉस्टेलमध्ये मात्र एकाच खोलीत राहतात. त्यातूनही कोरोनाचा संसर्ग बळावण्याची शक्यता निर्माण केली जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”