देशभरात 50 कोटी जनतेचे लसीकरण; कोरोना विरोधात भारताची दमदार लढाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विरुध्दच्या लढाईत भारताने दमदार कामगिरी करत आत्तापर्यंत देशातील तब्बल 50 कोटी जनतेला कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस दिला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 50.03 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. शुक्रवारी 43.29 लाख लोकांना लशीचा डोस देण्यात आला. त्यानंतर एकूण संख्या 50 कोटींच्या पार गेली आहे.

देशभरात लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरु करण्यात आली. 2 जानेवारीपासून फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु झाले. कोरोना लसीकरणाचा पुढील टप्पा 1 मार्चपासून सुरु झाला, ज्यामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसोबत 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ज्यांना गंभीर स्वरुपाचे आजार आहेत, अशा लोकांचे लसीकरण सुरु झाले.

https://twitter.com/MoHFW_INDIA/status/1423646673595772933?s=20

1 एप्रिलपासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील प्रत्येकासाठी लसीकरण सुरु करण्यात आले. तर 1 मे पासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरु झाले आहे. देशात 21 जून पासून 18 वर्षावरील सर्वांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. देशभरात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाच्या लसींचे एक कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

Leave a Comment