‘या’ बँकेत होते आहे सर्वाधिक फसवणूक, तुमचे खाते त्यात आहे का ते तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली I देशातील बँक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये कोटक महिंद्रा बँकेचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. 2021-22 च्या पहिल्या नऊ महिन्यांत कोटक महिंद्रा बँकेत बँक फसवणुकीच्या 642 घटना समोर आल्या आहेत. या फसवणुकीत एक लाख किंवा त्याहून जास्त रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. बँकेच्या फसवणुकीच्या बाबतीत कोटक महिंद्रानंतर आयसीआयसीआय बँक दुसऱ्या तर इंडसइंड बँक तिसऱ्या स्थानावर आहे.

अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सोमवारी संसदेत ही माहिती दिली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारने सांगितले की, कोटक महिंद्रा बँक फसवणुकीला बळी पडली नाही तर इतर अनेक लहान-मोठ्या बँकांमध्ये बँकिंगशी संबंधित हेराफेरी झाली आहे.

‘या’ बँकांमध्येही झाली फसवणूक
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ICICI बँकेतही फसवणुकीची एकूण 518 प्रकरणे समोर आली आहेत. फसवणुकीच्या सर्वाधिक प्रकरणांमध्ये इंडसइंड बँकेचा तिसरा क्रमांक आहे. या बँकेत फसवणुकीची 377 प्रकरणे समोर आली आहेत. त्याच वेळी, या कालावधीत एक्सिस बँकेत 235, एचडीएफसी बँकेत 151 आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 159 फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत.

पाच वर्षांत फसवणुकीची रक्कम कमी झाली
अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेत सांगितले की, गेल्या पाच वर्षांत सायबर गुन्ह्यांमुळे एकूण फसवणुकीचे प्रमाण कमी झाले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गेल्या काही काळापासून सायबर फसवणूक कमी करण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहे. त्यामुळे आता केसेसमध्ये सातत्याने घट होत आहे. यासोबतच सर्व बँका आपल्या ग्राहकांना आणखी सावध करण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोटक महिंद्रामध्ये प्रकरणे वाढत आहेत
अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेत सांगितले की, कोटक महिंद्रा बँकेत गेल्या काही वर्षांत फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. RBI च्या आकडेवारीनुसार, 2017 मध्ये बँकेत 135, 2018 मध्ये 289, 2019 मध्ये 383 आणि 2020 मध्ये 652 फसवणुकीची नोंद झाली आहे. त्याच वेळी, 2021 मध्ये, प्रकरणांची संख्या 826 वर पोहोचली आहे. 2021-2022 या आर्थिक वर्षात पहिल्या 9 महिन्यांत फसवणुकीचा आकडा 642 वर पोहोचला आहे.

Leave a Comment