धक्कादायक! 2 चिमुकल्यांसह आईची वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या

River
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने रागाच्या भरात आपल्या दोन मुलींसह नदीमध्ये उडी (suicide)घेतली. ही घटना कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिड्डी या गावामध्ये घडली आहे. दिपाली शितलकुमार खंगार असे आत्महत्या (suicide) करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
दीपाली शितलकुमार खंगार यांनी आपल्या देवांशी खंगार (वय 3 वर्ष) आणि वेदांशी खंगार (वय दीड वर्ष) अशा दोन मुलींना सोबत घेत नदीत उडी (suicide) घेतली. या घटनेत तिघींचाही मृत्यू झाला आहे. दीपाली यांनी आपल्या दोन मुलींसह जीव घेण्याचं हे धक्कादायक पाऊल नेमकं का उचललं हे अद्याप समजू शकलेलं नाही. त्यांनी काल रात्री 12 वाजता तिड्डी येथून जाणाऱ्या वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या (suicide) केली.

या घटनेची माहिती मिळताच कारधा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा शोध सुरु केला. आज सकाळी त्या तिघांचा मृतदेह सापडला आहे. यानंतर लगेचच मृतदेह शवविच्छेदनाकरता भंडारा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या तपासानंतरच त्या तिघांनी नेमकी आत्महत्या (suicide) कशामुळे केली हे स्पष्ट होईल.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!