सासूने गाठला विकृतीचा कळस ! सुनेला मारली मिठी अन् रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच….

Corona Test
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैदराबाद : वृत्तसंस्था – आजकाल सासू आणि सून यांच्यातील वाद हे काय आपल्याला नवीन नाही आहे. प्रत्येक घरात छोट्या मोठ्या कारणावरून सासू आणि सुनेमध्ये वाद होत असतात. अशीच एक सासू सुनेबाबत विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये कोरोनाबाधित सासूने सुनेचा बदला घेण्यासाठी थेट सुनेला मिठी मारली आहे. असे करण्यामागे सुनेलाही कोरोनाची लागण व्हावी असा उद्देश होता. यानंतर सुनेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिने आपल्या सुनेला घराबाहेर काढले आहे.

हि घटना तेलंगणातील एका जिल्ह्यामध्ये घडली आहे. या घटनेतील पीडितेचे तीन वर्षांपूर्वी कामारेड्डीमधील एक व्यक्तीसोबत लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी या पीडित महिलेच्या सासूला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर तिच्या सासूला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र आपली सून आपल्यापासून दूर राहात असल्याचं आणि फिजिकल डिस्टन्स ठेवत असल्याचं या सासूला सहन झाले नाही यातूनच तिनं आपल्या सुनेला आणि नातवाला मिठी मारली. यानंतर सुनेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि सासूची इच्छा पूर्ण झाली.

यानंतर या सासूने सुनेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सुनेला घराबाहेर काढले आहे. हा सगळा प्रकार पीडित सुनेच्या बहिणीने उघडकीस आणला आहे. सासूने पीडितेला घराबाहेर काढल्यानंतर तिच्या बहिणीने तिला आपल्या घरी घेऊन जात तिला होम क्वारंटाईन केले तसेच आवश्यक ती सर्व व्यवस्था केली. महिलेचा पती कामानिमित्त ओडिसामध्ये राहत असल्याने तो या परिस्थितीमध्येही तिची मदत करू शकला नाही. पिडितेचा पती पैसे कमावण्यासाठी नोकरीनिमित्त मागच्या सात महिन्यांपासून ओडिसामध्ये आहे.