धक्कादायक ! प्रेमात अडथळा ठरणाऱ्या 26 वर्षीय मुलाचा आईने केला खून

murder
murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गुरुदासपूर :वृत्तसंस्था – अनैतिक संबंधामध्ये माणूस कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही. यामध्ये माणूस एखाद्याचा जीव घ्यायला पण मागे पुढे पाहत नाही. अशीच नात्याला काळिमा फासणारी घटना गुरुदासपूर या ठिकाणी घडली आहे. यामध्ये आपल्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्याच 26 वर्षीय मुलाचा जन्मदात्याचं आईने प्रियकरासोबत मिळून खून केला आहे. हि आई एवढ्यावरच थांबली नाही तर तिने मृतदेह नाल्या मध्ये फेकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

काय आहे प्रकरण
मृताच्या आईचे एका व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. त्या दोघांच्यामध्ये हा मुलगा अडचण ठरत होता. या मुलानं अनेकदा आईला असं करू नकोस म्हणून समजावलेसुद्धा होते. मात्र ती त्याचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. या दोघांच्या संबंधांमध्ये अखेर 26 वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. अनैतिक संबंधामध्ये एखादी आई एवढ्या खालच्या थराला जाईल असे वाटले नव्हते.

पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील झंडो गुजरू गावात एका ठिकाणी एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन या घटनेचा पुढील तपास करत आहेत. यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन आणि त्याची ओळख पटवण्यात आली. मृत झालेल्या व्यक्तीचे नाव रणदीप सिंग असे आहे. यानंतर पोलिसांनी त्याच्या आईची चौकशी केली तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी आपला हिसका दाखवला तेव्हा मृत युवकाच्या आईने आणि तिच्या प्रियकराने हि हत्या केल्याचे कबुल केले आहे.

मृत मुलाची आई रुपिंदरजीत कौर आणि सुखविंदर सिंग या दोघांचे अनैतिक संबंध होते. याची माहिती रुपिंदरजीत कौर यांच्या मुलाला समजली होती. तेव्हापासून आई आणि मुलामध्ये सतत वाद होते. मुलगा आपल्या आईला असे करण्यापासून परावृत्त करत होता. या साऱ्याला वैतागून अखेर त्या निर्दयी आईने आपल्या पोटच्या मुलाला मारण्याचा प्लॅन केला. यानंतर निर्दयी आईने आपला प्रियकर सुखविंदर सिंग आणि त्याचा मित्र गुरुजित सिंग या दोघांच्या मदतीने मुलाचा खून केला. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.