हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोनाच्या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अगदी नवीन जन्म झालेली बाळांना ही आईच्या दुधाची कमतरता भासत आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर ज्या मातांना पुरेसे दूध नाही अश्या बाळांसाठी दूध संकलन केंद्राची निर्मिती केलेली आहे शिशुच्या वाढीसाठी सर्वोपचार रुग्णालयातील ‘मदर मिल्क बँक’ म्हणजे ‘अमृततुल्य’ आहेच. परंतु गेल्या तीन महिन्यापासून या दूध संकलन बँकेतील दुधाची घट झाली आहे. त्यामुळे केवळ दहापैकी दोन शिशुना दूध मिळतं आहे .
बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आईच्या दुधाची जास्त गरज असते. परंतु काही बाळांना जन्मताच, कमी दिवसाची किंवा कमी वजनाची असल्याने बाळांना आईपासून दूर राहावं लागतं किंवा शिशु दक्षता कक्षात राहावे लागत आहे. त्यावेळी या दुधाचा उपयोग होतो. ” कमी दिवसाचे बाळ किंवा एखाद्या घटनेत आईचा मृत्यू झाला असेल तर अशा प्रसंगात मदर मिल्क बँक वरदान ठरली आहे. अनेक दूध दाता माता अतिरिक्त दूध दान करतात. त्यावर प्रक्रिया करून साठवून केली जात आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वोपचार प्रसूती कमी झाल्याने त्याचा परिणाम मिल्क बँक वर झाला आहे. असे बालरोग शास्त्र विभाग जीएमसी अकोला येथील डॉक्टर विनीत वरठे यांनी व्यक्त केले आहे.
सर्वोपचार रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभाग कोविड साठी राखीव ठेवल्याने या ठिकाणी प्रसूतीची संख्या घटली आहे. तर दुसरीकडे जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये केवळ एक किंवा दोन माता दान करत आहेत. शिशुनच्या जन्मानंतर त्यांना आईचे दूध मिळत नसल्यास या बँकेचा वापर सुरू आहे. आजपर्यंत शेकडो मुलांचे जीव वाचले गेले आहेत. यापूर्वी त्या दुधाच्या माध्यमातून १० शिशुना दूध दिले जात होते परंतु आता कोरोनाच्या काळात दोनच मुलांना दूध पुरवले जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.