झोपेत असणाऱ्या मुलीची आईनेच केली हत्या; धक्कादायक काय आले समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मंगळवेढा : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यामधील मंगळवेढा याठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका जन्मदात्या आईने आपल्या पोटच्या मुलीची डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. मुलगी रात्री घराच्या गच्चीवर झोपलेली असतानाच आईने तिची हत्या केली आहे. यानंतर आरोपी आईने स्वतः पोलिसांत जाऊन अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलीची हत्या केल्याची माहिती दिली आहे. यानंतर पोलिसांनी या हत्येचा उलगडा करत आरोपी आईला अटक केली आहे. हि हत्या कशामुळे केली याचेदेखील कारण स्पष्ट झाले आहे.

काय आहे प्रकरण
मृत महिलेचे नाव मंगल कुबेर नरळे असे आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपी आईचे नाव चंदाबाई कुबेर नरळे असे आहे. दोघेही मंगळवेढ्यातील अकोला रस्ता याठिकाणी वास्तव्याला आहेत. मागच्या काही वर्षांपासून मृत मंगलचे आणि तिच्या आईचे जमीन आणि पैशाच्या वादातून नेहमी भांडणे होत होती. याच रागातून आई चंदाबाई यांनी मुलगी मंगलची हत्या केली आहे. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास चंदाबाई आणि मंगल या मायलेकी घराच्या गच्चीवर झोपल्या होत्या. तेव्हा मुलगी मंगलला झोप लागली असताना आईने तिच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली.

मुलीची हत्या केल्यानंतर आईने पहाटे तीनच्या सुमारास पोलीस स्थानकात जाऊन आपल्या मुलीची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाची पाहाणी केली. यानंतर पोलिसांना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी फिर्यादीच्या आईची चौकशी केली. यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी आईने आपल्या हत्येची कबुली दिली. हि हत्या जमीन आणि पैशाच्या वादातून केल्याचे आरोपी आईने कबूल केले आहे. याप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा अधिक तपास मंगळवेढा पोलीस करत आहेत.

Leave a Comment