अजित पवारच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवे होते; नवणीत राणा असं का म्हणाल्या?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आपण मातोश्रीवर जाणार नसल्याने म्हणत माघार घेतली आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मात्र कौतुक केलं. तसेच उद्धव ठाकरेंपेक्षा अजित पवार हेच मुख्यमंत्री असायला हवे होते अस नवनीत राणा यांनी म्हंटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नवनीत राणा म्हणाल्या, अजित पवारांनी परिपक्वतेने म्हंटल की लोकप्रतिनिधींची सुरक्षा करणे ही आमची जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. ज्याप्रकारे अजित पवार आपला विषय मांडतात आणि लोकप्रतिनिधींच्या व्यथा जाणून घेतात, त्यामुळे तुम्हाला जर महाविकास आघाडी सरकार बनवायचंच होत तर उद्धव ठाकरेंऐवजी अजित पवारच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला हवे होते, मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना देऊन महाराष्ट्राला डागच लावला आहे असे नवनीत राणा यांनी म्हंटल

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/714101186447872/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=sharing

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रावर गेल्या काही वर्षांपासून संकटे येत आहेत ती दूर व्हावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणावी असं आवाहन आम्ही केलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा म्हटली नाही. अस नवनीत राणा यांनी म्हंटल. मी धर्मासाठी लढायला आणि मरायला देखील तयार आहे. मी कोणालाही घाबरत नाही, देवासाठी माझा आजच जीव गेला तरी मला चिंता नाही असेही त्यांनी म्हंटल.

दरम्यान, आज सकाळी ९ वाजता राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाऊन हनुमान चाळीस पठण करणार होते. त्याच पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले होते. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येव्हडच नव्हे तर राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानाला शिवसैनिकांनी वेढा घातला होता. या संपूर्ण प्रकरणावरून मुंबईत वातावरण चिघळले होते. अखेर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी माघार घेतल्याची घोषणा केली आहे

Leave a Comment