हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल लागले असून महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. मात्र पक्षीय बलाबल पाहता भाजपने मुसंडी मारली आहे. चारही प्रमुख पक्षांमध्ये भाजपच्या जागा जास्त निवडून आल्या आहेत. यावरून खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा रिझल्ट आहे अशी टीका त्यांनी केली आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जातात. त्यांना समजून घेतात. त्यामुळे जनतेने भाजपाला साथ दिली, जनतेने शिवसेनेला नाकारले आहे. त्यामुळे जनता कोणासोबत आहे हे दिसून आलं आहे. हा तर फडणवीस यांच्या मेहनतीचा आणि उद्धव ठाकरे यांच्या बेईमानीचा रिझल्ट आहे, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांसाठी मतदान झाले. त्यात काँग्रेसने १७, राष्ट्रवादीने १७ आणि शिवसेनेने १२ अशा मिळून महाविकास आघाडीने आतापर्यंत ४६ जागा जिंकल्या. तर भाजपाने २३ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित १६ जागा इतर पक्षांकडे गेल्या आहेत.