हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणी संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार याची भेट घेत चर्चा केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला असल्याने यावरून खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. राज्याचे सरकार शिवसेना नसून शरद पवार चालवतात असे सांगत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्री ठाकरे व परब फेल ठरल्याची टीका राणा यांनी केली.
खासदार नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीस इतर असलेल्या प्रश्नात लक्ष घातले आहे. त्यांच्याकडून पुढाकार घेतला गेल्यामुळे कर्मचाऱ्यांच्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. आता एक चांगला संदेश सर्वांपर्यंत मिळेल व एसटी कर्मचारी आंदोलनावर लवकर तोडगा निघेल. दुसरीकडे मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहनमंत्री अनिल परब हे सरकारमध्ये फेल गेले आहेत. त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नवर तोडगा काढता आलेला नाही.
गेल्या तेरा दिवसांपासून मुंबईसह राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने सर्प केला जात आहे. मात्र, ठाकरे सरकारला अद्यापही कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप ताेडगा काढता आलेला नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली आहे. आता तीन पक्षाचे सरकार कोण चालवते आहे? हे आज स्पष्ट झाले असल्याचे राणा यांनी सांगितले.