हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेबाबत खासदार संभाजी छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेववावी,’ असे खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हंटले आहे.
बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घडलेल्या घटनेनंतर खासदार संभाजी छत्रपती यांनी ट्विट करीत प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे कि, “संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी,” अशी मागणी खासदार संभाजी छत्रपती यांनी केली आहे.
संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी. @PMOIndia @BSBommai
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 18, 2021
कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार झाल्यानंतर आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रणरागिणीनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. त्यांनी बेळगाव मध्ये शिवाजी गार्डन या ठिकाणी दुग्धाभिषेक घालत केल अभिवादन केले. सकाळपासून शिवाजी गार्डन परिसरात शिवप्रेमींना पोलिसांकडून मज्जाव केला जात होता. मात्र, महिला मोर्चाने दुग्धाभिषेक घालत विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना चोख प्रत्युत्तरही दिले.