Tuesday, February 7, 2023

घरीच थांबा, तुम्हा शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाईन; संभाजीराजेंचे आवाहन

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी सातत्याने आक्रमक भूमिका घेऊन पुढाकार घेणाऱ्या छत्रपती संभाजी राजे यांनी 2 दिवसांपूर्वी शिवभक्तांना मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कूच करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, आता संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील कोरोना पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले आहे.

मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणाऱ्या कडे-कपाऱ्या अन् शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड ! लाखो शिवभक्तांची हजेरी व सोहळ्याला चढलेला लोकोत्सवाचा साज ! दुर्दैवाने यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन मी पुन्हा करत आहे. स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा पाळत असत. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत’, असं संभाजीराजे म्हणाले.

- Advertisement -

त्याचबरोबर ‘सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडीतपणे साजरा करण्याची जबाबदारी माझी..!माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे; यासाठी आपण घरीच थांबावे. तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन’, असंही संभाजीराजे यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.