सातारा | जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या तीन दिवसात त्यांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाल्याने त्यांनी रूग्णालयातूनच आपल्या कामास सुरूवात केली आहे. खा. पाटील यांच्या कामाची पध्दत सर्वसामान्य लोकांना माहिती असून त्यांनी रूग्णालयातून कामांचा निपटारा करतानाचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यशील असणारे सिक्कीमचे माजी राज्यपाल व सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्वतः ट्विट करत तब्बेतीची माहिती दिली आहे.
दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आता हळूहळू हॉस्पिटलमध्ये कामकाजाला सुरुवात केली. डॉक्टरांचे योग्य उपचार, आपल्या शुभेच्छा व प्रार्थनेमुळे तब्येतीत सुधारणा होत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लवकरच मी आपल्या सेवेत पुन्हा रुजू होईल. सर्व शुभचिंतकांचे मनापासून आभार. pic.twitter.com/a4aH6kIFvJ
— Shriniwas Patil (@ShriPatilKarad) January 23, 2022
दि. 20 जानेवारीला त्यांचा कोरोना अहवाल बाधित आल्याची माहिती त्यांनी स्वत: त्यांच्या सोशल मिडिया औकांऊटवरुन जिल्हावासीयांना दिली होती. रविवारी पुन्हा त्यांनी आपल्या औकाऊंट वरून रूग्णालयातून कामकाजास प्रारंभ केला असल्याची माहिती फोटोसह शेअर केली आहे. यावर त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे कौतुक करीत ‘साहेब, लवकर बरे व्हा.’अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.