‘स्वतःचा गोंधळ समोर येऊ नये म्हणून विरोधकांचा गोंधळ’; खासदार सुप्रिया यांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
टीम, HELLO महाराष्ट्र।  भाजपाची सत्ता असताना त्यांच्या सत्ताकाळातील सावळा गोंधळ महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेसमोर येऊ नये म्हणून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आणि संसदेत केंद्रातील मोदी सरकार गोंधळ घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या  बारामती येथे बोलत होत्या.

                                                                                                                                                              विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. या अधिवेशनात विधीमंडळात पहिल्याच दिवशी विरोधकांनी  सावरकर यांच्याविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून गोंधळ घातला होता. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीचे विधिमंडळाच्या कामकाजास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. दुसऱ्या ही दिवशी विरोधकांनी शेतकरी प्रश्नावरून असाच गोंधळ घातला. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात विरोधक भलतेच आक्रमक झाले होते. त्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान भाजप नेत्यांनी मागील पाच वर्षाच्या सत्ताकाळात घातलेला गोंधळ जगासमोर येऊ नये. यामुळेच विरोधक विधिमंडळाच्या कामकाजात गोंधळ घालताना दिसत  आहेत. असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा ही यावेळी सुप्रिया सुळे यांनी निषेध केला. देशाची खालावत चाललेल्या आर्थिक स्थितीची राज्यातील विरोधी पक्षाला आणि केंद्रातील मोदी सरकारला चिंता नसल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील उद्योग बंद पडत असून बेरोजगारी वाढत असल्याकडे सुळे यांनी यावेळी लक्ष वेधले.